मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेचा निकाल जाहीर..!

 

राज्य शासनातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ ( Chief Minister My School Beautiful School Contest)या अभियानात सहभागी झालेल्या १ लाख ३ हजार ३१२ शाळामधून पारितोषिकास पात्र ठरलेल्या शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे.त्यात शासकीय शाळांच्या गटात वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साखरा, (Zilla Parishad Primary School Sakhara in Washim District)या शाळेने प्रथम क्रमांक तर रायगड जिल्हा परिषद प्रायमरी स्कूल हेदवली (Raigad Zilla Parishad Primary School Hedwali)शाळेने द्वितीय आणि सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा,ढालेवाडी (Zilla Parishad School, Dhalewadi of Sangli District)या शाळेने तृतीय क्रमांक पटकावला आहे. तर खाजगी शाळांच्या गटामध्ये नाशिक जिल्ह्यातील एस्पालियर, द हेरिटेज स्कूल,  बेळगाव धागा शाळेने प्रथम, पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील शारदाबाई पवार विद्यानिकेतन, शारदानगर (Shardabai Pawar Vidyaniketan, Shardanagar)येथील शाळेने द्वितीय क्रमांक आणि छत्रपती संभाजीनगर येथील भोंडवे पाटील स्कूल बजाज नगर शाळेने तृतीय क्रमांक पटकावला आहे.

👉प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या शाळांची pdf यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाचा पारितोषिक वितरण समारंभ येत्या पाच मार्च रोजी मुंबई येथे होणार असून या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसेच राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती आहे.तसेच राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, शालेय शिक्षणा सचिव रंजीतसिंग देओल, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी आदी उपस्थित राहणार आहेत.

👉मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत महावाचन चळवळ सुरू

 

राज्यस्तरीय पुरस्काराबरोबरच विभाग निहाय पुरस्कार जाहीर झाले असून पुणे विभागातून शासकीय शाळा गटामध्ये  प्रथम क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाबे शाळेने, तर द्वितीय क्रमांक अहमदनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संवत्सर शाळेने आणि तृतीय क्रमांक सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचणी या शाळेने पटकावला आहे. तर खाजगी शाळा गटामध्ये प्रथम क्रमांक प्रवरा कन्या विद्या मंदिर आणि ज्युनिअर कॉलेज लोणी काळभोर या शाळेने पटकावला आहे. द्वितीय क्रमांक सोलापूर जिल्ह्यातील निंबर्गी येथील श्री बसवेश्वर स्कूलने तर तृतीय क्रमांक पुणे जिल्ह्यातील गुरुवर्य आर.पी. सबनीस, विद्यामंदिर,नारायणगाव या शाळेने पटकावला आहे.

👉बक्षीसपात्र शाळांचा गुणगौरव सोहळा निमंत्रण पत्रिका पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

दारम्यान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमांत  1 लाख  3 हजार 312 शाळा सहभागी झाल्या. यामध्ये 64 हजार 312 शासकीय शाळा आणि 39 हजार खाजगी शाळांचा समावेश आहे. या शाळांमधील 1 कोटी 99 लाख 61 हजार 586 विद्यार्थी सहभागी झाले. यामध्ये 1 कोटी 4 लाख 64 हजार 420 विद्यार्थी व 94 लाख 97 हजार 166 मुलींचा सहभाग होता.

 

👉बक्षीसपात्र शाळांची यादी पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

अभियानात बक्षिसांची रक्कम 66 कोटीवर

 

राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या शाळेस 51 लाख, द्वितीय क्रमांक 21 लाख आणि तृतीय क्रमांकाच्या शाळेस 11 लाखाचे पारितोषिक देण्यात येणार आहे.  या  अभियानात राज्यस्तरावर-1, बृहन्मुंबई मनपा-1, अ व ब वर्ग मनपा-1, विभागस्तरीय-8, जिल्हास्तरीय-36, तालुकास्तरीय-358 अशी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे देण्यात येणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका व ‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रातील शाळांना पहिले 21 लाख, दुसरे 11 लाख व तिसरे पारितोषिक 7 लाख रूपयांचे असेल. 8 विभागीय स्तरावर पहिले 21 लाख, दुसरे 11 लाख, तिसरे 7 लाख रूपयांचे, जिल्हास्तरावर पहिले 11 लाख, दुसरे 5 लाख, तिसरे 3 लाख रुपये तर तालुकास्तरावर पहिले 3 लाख, दुसरे 2 लाख, तिसरे 1 लाख रुपये, अशी 66 कोटी 10 लाखाची बक्षिसे देण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

👉Tet परीक्षा एप्रिल/मे मध्ये होणार ऑफलाईनच! सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *