Breaking news: 1 ली ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत 2 गणवेश मिळणार..

 

Free Uniform 2024-25 : इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना गणवेश पुरविण्याबाबत परिषदेमार्फत ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यातून मे. प‌द्मचंद मिलापचंद जैन यांना 4 मार्च रोजी 44 लाख 60 हजार 4 विद्यार्थ्यांसाठी कापड पुरवठ्याचा आदेश देण्यात आला आहे. हा कापड पुरविल्यानंतर गावपातळीवरील महिला बचत गटामार्फत गणवेशाची शिलाई केली जाणार आहे.

 

👉सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

जूनमध्ये सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रात राज्यातील 44 लाख 60 हजार विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश शिवून मिळणार आहेत. त्यासाठी राज्य स्तरावरून ठराविक मापात कापलेला कापड पुरविला जाणार असून गावातील बचत गटाच्या महिला हा गणवेश शिवून शाळांपर्यंत पोहोचविणार आहेत. याबाबतचा ‘कार्यारंभ’ आदेश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून देण्यात आला आहे.

 

👉सविस्तर शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

मोबदला 110 रुपये

 

प्रत्येक विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीच्या गणवेशासाठी किती कापड लागेल, याची मागणी महिला आर्थिक विकास महामंडळाकडून नोंदविली जाईल.

 

जेवढे गणवेश द्यायचे आहेत, तेवढे कापड ठराविक (स्टँडर्ड) मापानुसार कापून (मायक्रो कटिंग करून) पुरवठा केला जाईल.

एक गणवेश शिवून देण्यासाठी बचत गटांना 110 रुपये याप्रमाणे मोबदला दिला जाणार आहे.

मोफत गणवेश योजना ही 2024-25 पासून लागू राहणार आहे.

👉संचमान्यतेचे सुधारीत निकष- शासन निर्णय निर्गमित

 

👉सविस्तर शैक्षणिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *