Educational News : राज्यात 4 ते 6 एप्रिलदरम्यान होणार संकलित मूल्यमापन चाचणी! वेळापत्रक जाहीर

राज्यातील शिक्षण पद्धतीचे अध्यापन, अध्ययन आणि परिणामांचे बळकटीकरण (स्टार्स) कार्यक्रमांतर्गत सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती निश्चितीसाठी संकलित मूल्यमापन चाचणी घेण्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार येत्या ४ ते ६ एप्रिलदरम्यान तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची भाषा, गणित व इंग्रजी या विषयांची संकलित मूल्यमापन चाचणी होणार आहे. (Nashik Evaluation held in state from April 4 to 6 marathi news)

👉हेही पहा-भावी शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी

प्रश्नपत्रिका, शैक्षणिक साहित्याचा होणार पुरवठा

एससीईआरटीच्या संचालकांच्या प्रस्तावानुसार राज्यातील खासगी अनुदानित शाळांमधील तिसरी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना संकलित मूल्यमापन चाचणीच्या प्रश्नपत्रिकांचा पुरवठा होणार आहे.

👉अतिशय सुंदर व्हिडिओ आहे शिक्षक असाल तर नक्की एकदा पहाचं व इतरांना शेअर करा 🙏🙏

“शालेय पातळीवरील विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती निश्चितीसाठी संकलित मूल्यमापन चाचणी चांगला उपक्रम आहे. या माध्यमातून विद्यार्थी प्रगतीत येणाऱ्या समस्या समजण्यास मदत मिळते. विद्यार्थीस्तर निश्चितीस शिक्षकांना योग्य संधी मिळते.”click here 👉 Watch more news

-डॉ. नितीन बच्छाव, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

असे आहे संकलित चाचणीचे वेळापत्रक :

तारीख : विषय : इयत्ता

४ एप्रिल : मराठी : तिसरी ते आठवी

५ एप्रिल : गणित : तिसरी ते आठवी

६ एप्रिल : इंग्रजी : तिसरी ते आठवी

वेळ : तिसरी-चौथीसाठी : ९० मिनिटे

पाचवी- सहावीसाठी : ९० मिनिटे

सातवी-आठवीसाठी : १२० मिनिटे

गुण : तिसरी-चौथीसाठी : ३० गुण

पाचवी-सहावीसाठी : ४० गुण

सातवी-आठवीसाठी : ५० गुण

वेळापत्रकानुसार मराठी व गणित विषयासाठी सर्व माध्यमांचा समावेश आहे. इंग्रजी विषयासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा वगळल्या आहेत. गुण आणि वेळ सर्व विषयांसाठी समान आहेत.

👉Click here

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *