महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (Tait) या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने दिनांक 22/02/2023 ते 03/03/2023 कालावधीत आयोजन करण्यात आले होते.
👉सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सदर परीक्षेचा निकाल दिनांक 24/03/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आला.व गुणदान यादी परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.
👉CTET appear विद्यार्थी संदर्भातील बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सदर परीक्षेत प्रविष्ट झालेल्या उमेदवारांचे गुणपत्रक score card परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत.
तरी उमेदवारांनी त्यांचे गुणपत्रक score card दिनांक 20/04/2023 पर्यंत download करुन घ्यावे व त्याची प्रत पुढील कार्यवाहीसाठी जपून ठेवावी.
👉सविस्तर परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पुढील महत्त्वाची सूचना म्हणजे 20/04/2023 सदरची वेब लिंक बंद करण्यात येणार आहे.त्यानंतर याबाबतीत आलेल्या विनंतीचा विचार केला जाणार नाही असे परीक्षा परिषदेमार्फत सुचवण्यात आले आहे.