आरटीई प्रवेश 2024-25 वयोमर्यादा | rte admission 2024-25 age limit maharashtra

 

 

महाराष्ट्र सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्रात आरटीई २५ टक्के शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्यावाचत खालील प्रमाणे सुचना देण्यात येत आहे.

 

👉RTE admission२०२४-२५ वयोमर्यादा 

 

शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत दिनांक १८/०९/२०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये मानीव दिनांक ३१ डिसेंबर करण्यात आला आहे. शासनाने किमान वयोमर्यादा ठेवलेली आहे परंतु कमाल वयोमर्यादा नाही. मानिव दिनांक बदलामुळे माहे जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या विद्याथ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ साठी आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी वयोमर्यादा दिनांक ३१ डिसेंबर २०२४ अखेर पुढील प्रमाणे राहील.

👉RTE admission 2024-25

rte admission 2024-25 age limit maharashtra

 

१.प्ले ग्रुप / नर्सरी

वयोमर्यादा – १ जुलै २०२०- ३१ डिसेंबर २०२१

दि ३१ डिसेंबर २०२४ रोजीचे किमान वय – 3 वर्ष

दि ३१ डिसेंबर २०२४ रोजीचे कमाल वय – ४ वर्ष ५ महिने ३० दिवस

२. ज्युनियर केजी

वयोमर्यादा – १ जुलै २०१९ – ३१ डिसेंबर २०२०

दि ३१ डिसेंबर २०२४ रोजीचे किमान वय – 4 वर्ष

दि ३१ डिसेंबर २०२४ रोजीचे कमाल वय – ५ वर्ष ५ महिने ३० दिवस

३.सिनियर केजी

वयोमर्यादा – १ जुलै २०१८ – ३१ डिसेंबर २०१९

दि ३१ डिसेंबर २०२४ रोजीचे किमान वय – 5 वर्ष

दि ३१ डिसेंबर २०२४ रोजीचे कमाल वय – ६ वर्ष ५ महिने ३० दिवस

४.इयत्ता १ ली

वयोमर्यादा – १ जुलै २०१७ – ३१ डिसेंबर २०१८

दि ३१ डिसेंबर २०२४ रोजीचे किमान वय – 6 वर्ष

दि ३१ डिसेंबर २०२४ रोजीचे कमाल वय – ७ वर्ष ५ महिने ३० दिवस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *