महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे ने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी २०२४ ची अंतिम उत्तर सूची परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.

 

रविवार दि. १८ फेब्रुवारी, २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) या परीक्षेची इयत्तानिहाय, माध्यमनिहाय, पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची दि. ०६ मार्च, २०२४ रोजी परिषदेच्या https://www.mscepuppss.in व https://www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती.

 

👉पाचवी आठवी स्कॉलरशिप परीक्षा अंतिम उत्तर सूची संदर्भातील शासन परिपत्रक निर्गमित

 

अंतरिम उत्तरसूचीसंदर्भात विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या आक्षेपांवर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन परीक्षा परिषदेने उत्तरसूची सुधारित केली आहे. या उत्तरसूचीतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. या अंतिम उत्तरसूचीबाबत आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, या अंतिम उत्तरसूचीच्या आधारे निकाल तयार करण्यात येईल. याची कृपया नोंद घ्यावी असे सुचित करण्यात आले आहे.

 

 

सदर प्रसिध्दीपत्रक अंतिम उत्तरसूचीसह परिषदेच्या https://www.mscepuppss.inhttps://www.mscepune.in या संकेतस्थळावरही प्रसिध्द करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *