विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची असणारी 5वी, 8वी ची स्कॉलरशिप परीक्षा शैक्षणिक वर्ष 2023-24 परीक्षेचे ऑनलाइन आवेदनपत्र 01/07/2023 रोजी भरण्यात येणार होते, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे या परीक्षेचे ऑनलाइन आवेदनपत्र भरण्यास 01/09/2023 पासून सुरू करण्यात येणार आहे.

👉सविस्तर परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

शाळांना ऑनलाइन आवेदनपत्र भरण्यासाठी www.mscepuppss.in या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

👉शिष्यवृत्ती रकमेत झाली चौपट वाढ GR पहा

जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सदर परीक्षेला प्रविष्ट होण्यास प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषद व मनपा यांना विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क भरणा व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद निर्मित ‘शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शिका संच’ जिल्हा परिषद सेस फंड/मनपा निधीतून उपलब्ध करून देण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत.

👉नवोदय फॉर्म ( 2024 )भरण्यास मुदतवाढ

शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून शिष्यवृत्ती रकमेत सुद्धा भरमसाठ अशी वाढ करण्यात आलेली आहे. पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिमाह 500 रुपये याप्रमाणे वार्षिक 5000 रुपये झाली आहे.

👉जुनी पेन्शन होणार लागू सविस्तर पहा

तर आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिमाह 750 याप्रमाणे वार्षिक 7500 रुपये इतकी अशी भरीव वाढ केलेली आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांचा फायदा होऊन एकंदरीत त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी खूप मदत होणार आहे.

👉आवेदन पत्र भरण्यासाठी येथे भेट द्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *