Breaking News:गेली अनेक वर्ष विनावेतन काम करणारे अघोषित शिक्षक बांधव तसेच अंशतः अनुदानित शिक्षक बांधव यांनी आपल्या हक्काचा शंभर टक्के पगार मिळावा यासाठी ऐन दिवाळीमध्ये आझाद मैदानावर आंदोलन पुकारले होते.या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने सदर कर्मचाऱ्यांना 31 डिसेंबर 2023 पर्यंत अनुदान देण्याचे जाहीर केले होते. व 01 जानेवारी 2024 पासून पुढील वाढिव टप्पा अनुदान देण्याच्या अनुषंगाने शासनाने 12/12/2023 रोजी परिपत्रक काढून पुढील कार्यवाही तात्काळ करण्यासंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.Read more..

 

👉सविस्तर शासन परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

शासन निर्णय दिनांक 06/02/2023 व शासन निर्णय परिपत्रक दिनांक 24/04/2013, दिनांक 25/09/2023 व शासन परिपत्रक दिनांक 26/09 2023 अन्वये पात्र उच्च माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांना अनुदान मंजुरीची कारवाई संदर्भीय पत्र दिनांक 22/09/ 2023 अन्वये दिनांक 31/12/2023 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश प्राप्त झालेले आहेत.

Read more..

 

👉06 फेब्रुवारी 2023 चा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

पुढील प्रत्येक वर्षी आधार प्रमाणित संच मान्यता पूर्ण करून अनुदानाचा पुढील टप्पा देण्याबाबतचा प्रस्ताव आर्थिक भारासह सादर करण्याबाबत सूचना प्राप्त झालेल्या आहेत. माननीय संचालकाच्या संदर्भीय पत्रातील दिलेल्या कालमर्यादेचे कटाक्षाने पालन व्हावे यासाठी चालू शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या संच मान्यता माहे जानेवारी 2024 च्या दुसऱ्या आठवड्यात होणे अपेक्षित आहे.Read more..

 

👉24 एप्रिल 2023 चा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

 

आधार प्रमाणित विद्यार्थी वैद्यआधार संच मानता विषय निहाय कार्यभारासह जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात करावयाचे नियोजन आहे.तरी संच मान्यता शिबिराबाबत वेळापत्रक पुढील आठवड्यात देण्यात येईल तुर्तास संच तयार करण्याची पूर्वतयारी करण्यात यावी, सदर प्रकरणी विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी असे सूचित करण्यात आले आहे.

Read more..

 

👉शैक्षणिक बातम्या, शासन निर्णय व परिपत्रक पाहण्यासाठी आमच्या WhatsApp Group ला जॉईन व्हा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *