मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी शासनाकडून मिळणार 90% सबसिडी

 

शेतकरी योजना Update:मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज सुरु झाले असून तुम्हाला हि या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लगेच अर्ज सादर करून घ्या, कारण या योजनेसाठी अर्ज मागविणे सुरु झाले आहे.

 

कोणत्या व्यक्ती पात्र आहेत?, अर्ज कोठे करावा?, किती अनुदान मिळते? या संदर्भातील सविस्तर माहिती याठिकणी जाणून घेवूया.

 

शेतामध्ये बहुतांश कामे करण्यासाठी ट्रॅक्टरचा उपयोग केला जातो. त्यामूळे अनेकांना ट्रॅकर खरेदी करण्याची इच्छा असते. परंतू अर्थिक पाठबळ नसल्याने अनेकजण इच्छा असूनही ट्रॅक्टर खरेदी करु शकत नाहीत.अशावेळी शासकिय अनुदानावर तुम्ही ट्रॅक्टर खरेदी करु शकतात.

 

  • मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी लाभार्थी पात्रता:

 

मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही नवबौध्द किंवा अनुसुचित जाती घटकातील अर्जदार असणे आवश्यक आहे.

 

👉अर्ज करायचा असेल तर सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

  • मिनी ट्रॅक्टर योजना आवश्यक कागदपत्रे

 

१.बँक पासबुक

२.बचत गटाचे घटना पत्र

३.बचत गटाच्या कार्यकारणी मधील सदस्यांची मूळ यादी

४.बचत गटातील सर्व सदस्यांचा जातीचा दाखला

५. कोऱ्या कागदावर फोटो सहित बचत गटाची ओळख पत्र

६.आधार कार्ड, पॅन कार्ड

 

 

👉शेतकऱ्याकडील कर्ज वसुलीला स्थगिती देण्यासाठी शासनाने २९ डिसेंबर २०२३ रोजी केला शासन निर्णय निर्गमित

 

 

  • समाज कल्याण विभागामार्फत योजना-

 

समाज कल्याण विभागामार्फत ही योजना राबविली जाते. मिनी ट्रॅक्टर योजना अंतर्गत 9 ते 18 HP चे मिनी ट्रॅक्टर दिले जाते.

  • किती अनुदान मिळते-

 

मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने इत्यादीसाठी 90 टक्के अनुदान मिळते.ट्रॅक्टर व त्यांच्या उपसाधनावर 3.15 लाख रूपये अनुदान देण्यात येते.

  • कोणाला मिळणार अनुदान-

 

ज्या बचत गटांना या मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ दिला जाणार आहे त्या बचत गटामध्ये 80 टक्के सदस्य अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांतील असणे आवश्यक आहे.योजनेचा लाभ पुरुष आणि महिला बचगटांना देण्यात येतो.

 

  • कोठे करावा अर्ज-

 

मिनी ट्रॅक्टरयोजनेचा लाभ घेण्यासाठी सहाय्यक आयुक्त समाकल्याण येथे अर्जाचा नमुना उपलब्ध असुन पात्र बचत गटांनी आपापले अर्ज सादर करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • योजनेची व्याप्ती-

 

ही योजना महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात लागु आहे.ज्या त्या जिल्ह्यातील अर्ज करण्याची तारीख वेगवेगळी असू शकते त्यामूळे अर्जदारांनी आपापल्या जिल्ह्यातील समाजकल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख-

 

जालना जिल्ह्यासाठी मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जानेवारी २०२४ ही आहे. तुम्ही जर जालना जिल्ह्यातील असाल तर मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी लगेच अर्ज सादर करून घ्या.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *