‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान 2024 साठी कालदर्शिका…

 

महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी दिनांक सहा जानेवारी २०२४ रोजी दिलेल्या निर्देशानुसार मुख्यमंत्री माजी सुंदर शाळा अभियानासाठी कालदर्शिका पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आली आहे.

 

 

 

राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विदयार्थी व माजी विदयार्थी यांच्या शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विदयार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातारवण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अभियान राबविण्यासाठी दि.३०.११.२०२३ अन्वये शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यक्रमनिहाय जबाबदा-या, मार्गदर्शक सूचना या सर्व बाबी या कार्यालयाच्या वाचा येथील नमूद पत्रान्वये आपणांस कळविण्यात आलेल्या आहेत. त्याचे आपल्याकडून अवलोकन होऊन त्याप्रमाणे कार्यवाही होऊन त्या शाळांपर्यंत पोहचविण्यात आलेल्या असतील अशी अपेक्षा आहे.

 

२/- उक्त अभियान हे विहित कालावधीत पार पाडण्यासाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत सुस्पष्टता येण्यासाठी दिनांकनिहाय कालदर्शिका तयार करुन ती सोबत जोडली आहे. त्यानुसार नमूद केलेल्या अधिकारी यांनी आपल्याकडील जबाबदारी योग्यरित्या पार पाडून अभियान यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *