शुभांगी ताई पाटील यांची काल पुणे शिक्षण आयुक्त कार्यालयात धडाके बाज कामगिरी आणि लगेचच आज 56 शालार्थ निकाली

असंख्य शिक्षकांचे प्रलंबित कामे लावले मार्गी.

दी. 11/3/2024 रोजी

शिवसेनेच्या उपनेत्या तथा महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांनी शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी पुणे आयुक्त कार्यालय येथे भेट देत शिक्षकांचे असंख्य प्रलंबित कामे मार्गे लावली. यावेळी माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक माननीय सूर्यवंशी साहेब तसेच आत्तार साहेब , गोसावी साहेब व सर्व विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन शिक्षकांचे जिव्हाळ्याचे व प्रमुख प्रश्न या बैठकीत मांडण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने-

 

👉सविस्तर माहितीसाठी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

1) माध्यमिक व उच्च माध्यमिक , ज्युनिअर कॉलेज चे अद्यापही प्रलंबित असलेले शालार्थ आयडी व मान्यता मिळण्यासाठी ठाम भूमिका घेत तात्काळ प्रलंबित शालार्थ आयडी देण्याची मागणी केली असता येत्या तीन ते चार दिवसात राहिलेले सर्व शालार्थ आयडी देण्याच्या आश्वासन माननीय शिक्षण संचालक यांनी दिले. त्या प्रमाणे आज 55 ते 60 लोकांची फाईल निकाली कालच साहेब त्यावर शुभांगी ताई म्हटले होते नक्की तीन ते चार दिवसात शालार्थ आयडी दिले जातील का? त्यावर माननीय शिक्षण संचालक म्हटले की ताई मागील वेळेस देखील तुम्ही दिवाळीच्या वेळी प्रलंबित शालार्थ आयडी साठी आले होते व त्यावेळी देखील आम्ही तुम्हाला दिलेल्या शब्दां नुसार तीन ते चार दिवसातच 300 ते 400 शालार्थ आयडी दिले होते. त्याचप्रमाणे यावेळी देखील प्रलंबित असलेले शालार्थ आयडी येत्या तीन ते चार दिवसात देऊ असे आश्वासन दिले.

 

👉या कर्मचाऱ्यांना शासकीय काम करण्यासाठी मिळणार शासनातर्फे मोफत मोबाईल फोन

 

2) शंभर टक्के अनुदानित शाळांवरील तसेच अंशता अनुदानित शाळा वरील शिक्षकांची फरक बिले या बाबत शुभांगी ताईंनी प्रलंबित बिले तात्काळ अदा करण्याची मागणी केली असता ज्या शिक्षकांचे मेडिकल बिल व फरक बिल ही प्रलंबित आहेत त्याबाबत येत्या एक-दोन दिवसात व्हीसी घेऊन खाली सदरची बिले अदा करण्याचे सांगतो असे आश्वस्त केले.

 

 

3) त्याचप्रमाणे प्रस्तावित वाढीव पदांवरील शिक्षकांना मूळ आस्थापनेवर ते काम करत असलेल्या ठिकाणीच मान्यता द्यावी याबद्दल शुभांगी ताईंनी जोरदार मागणी केली व सांगितले की एक शिक्षक दोन जिल्ह्यांमध्ये किंवा दोन तालुक्यांमध्ये कशाप्रकारे काम करू शकतो त्यातल्या त्यात महिला शिक्षकांना अशाप्रकारे काम करण्यास मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होणार आहेत . त्याचबरोबर ज्या शिक्षकाचा दुसऱ्या कॉलेजला संबंधित विषय नसेल त्या ठिकाणी कशाप्रकारे समायोजन करता येईल त्याचप्रमाणे ते शिक्षक ज्यामुळे स्थापनेवर आहेत त्या आस्थापनेवर जर विद्यार्थी संख्या आहे व ते शिक्षक सामावले जात असतील तर त्यांना त्याच ठिकाणी प्राधान्याने घेण्यात यावे याबद्दल मीटिंगमध्ये जोरदार मागणी लावून धरली असता त्यावर माननीय शिक्षण संचालक यांनी तात्काळ दोन दिवसात याबाबत सर्व शिक्षण उपसंचालकांकडून संपूर्ण माहिती घेऊन त्यानुसार शिक्षक हिताची कारवाई करण्यात येईल असे सांगितले त्याचप्रमाणे ज्या शिक्षकांचे नावे यादीत आलेली नाहीत त्यांची खालून माहिती मागून त्यांची स्वतंत्र यादी काढण्याचे अस्वस्थ केले.

 

👉अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांची होणार 2023-24मधील offline संचमान्यता

 

4) त्याचप्रमाणे या मीटिंगमध्ये अघोषित शाळा संदर्भात देखील शुभांगी ताईंनी विचारणा केली की राहिलेल्या घोषित शाळा यांची यादी कधी लावण्यात येईल त्याबाबत महासंचालक यांनी सांगितले की या शाळांची तपासणी सुरू असून लवकरच येत्या आठ ते दहा दिवसात त्यांची यादी लावण्यात येईल .

5) त्याचप्रमाणे त्रुटी तील शाळांची देखील टप्पा वाढ साठी ची यादी लवकरच लावण्यात येईल.

6) ज्या शाळा 6 फेब्रुवारी रोजी च्या शासन जीआर नुसार पात्र असूनही त्यांना अद्यापही अनुदान मिळालेले नाही अशा शाळांना लवकरात लवकर अनुदान देण्यात यावे यासाठी देखील यावेळी शुभांगी ताईंनी जोरदार पाठपुरावा केला.

7) सन 2023 – 24 च्या संच मान्यतते मुळे शिक्षकांची अनेक पदे रद्द होत होती त्यामुळे सन 2023 24 संच मान्यता तात्काळ देण्याची मागणी करून त्याची सुरुवात देखील करून घेतली.

 

👉जुनी पेन्शन योजना लागू ! शासन निर्णय निर्गमित

यावेळी राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांनी स्वतः दिवसभर आयुक्त कार्यालयात बसून वैयक्तिक स्तरावर देखील विभागातून आलेल्या असंख्य शिक्षकांची वैयक्तिक कामे मार्गी लावली व त्यानंतर पुणे शिक्षण उपसंचालक कार्यालय येथे स्वतः जाऊन सहसंचालक श्रीमती ज्योती सोळंकी मॅडम यांची भेट घेत त्या ठिकाणी शालार्थ आयडी च्या व मान्यतेच्या राहिलेल्या फाईल तात्काळ पूर्ण करून संचालक स्तरावर पाठवण्याची कार्यवाही केली.

 

याप्रसंगी शिवसेना उपनेते शुभांगी ताई पाटील यांच्यासह महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनचे अविनाश घोरपडे सर तसेच शिक्षक सेनेचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अंबादास शिंदे सर यांच्यासह महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनचे व शिक्षक सेनेचे पदाधिकारी व बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *