जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा अधिकार…
Old pension scheme:राज्यात 2005 नंतर सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी अनेक दिवसापासून कर्मचारी वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करत आहेत. हे आंदोलन करत असताना राज्य शासन जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा सर्वस्वी अधिकार केंद्राला आहे असे सांगत होते. परंतु सद्यस्थिती जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भामध्ये लागू करण्याचा आदेश कोणाला आहे याचं सविस्तर परिपत्रक काढून केंद्र शासनाने राज्याकडे बोट दाखवलेले आहे तर चला पुढे आपण बघूया काय आहे बातमी….Read more…
👉कर्मचाऱ्यांचे वेतन या तारखेला जमा होणार खात्यात जमा
जुनी पेन्शन हा विषय राज्याचाच केंद्र सरकार कडून अखेर शुभांगी ताईंना स्पष्टीकरण, राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांची दिशाभूल.
राज्यात शिक्षक व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी शिवसेना उपनेते शुभांगी ताई पाटील यांनी अनेक वेळा राज्यात पाठपुरावा केला असता तो विषय केंद्र सरकारचा असल्याचे वेळोवेळी सांगितले जात होते. म्हणून याबाबत शुभांगी ताईंनी मागील महिन्यात केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्याकडे जुन्या पेन्शन साठी पाठपुरावा केला असता त्याबाबत नुकतेच केंद्रीय शिक्षण मंत्रालय शालेय शिक्षण विभाग यांच्याकडून शुभांगी ताईंना पत्र प्राप्त झाले आहे. त्यामध्ये सदरचा विषय हा राज्य सरकारच्या अखत्यारीतला असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. यावरून समजते की राज्य शासनाकडून शिक्षक कर्मचाऱ्यांची वेळोवेळी केंद्राच्या नावावर दिशाभूल करण्यात येते.
👉 click here Pdf download link