आजाद मैदानावर होणाऱ्या शिक्षकांच्या आंदोलनास उपस्थित  राहण्याचे आव्हान -खंडेराव जगदाळे सर 

‘अभी नही तो कभी नही…!’

आंदोलनाला याल तर यश मिळेल नाहीतर नक्कीच फसाल.

३ जानेवारी २०२४ पासून आझाद मैदानावर आंदोलन सुरू
लढा आपल्यासाठी आपल्या कुटूंबासाठी…
शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या सर्व प्रलंबित प्रश्नांची सोडवूक करण्यासाठी आंदोलन पुकारले आहे. यावेळी मात्र सर्वांनी गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.मागील आंदोलनात मी दिनांक ८ नोव्हेंबर २०२३ रोजी शासन आपल्याला शब्दांच्या खेळात अडकवून फसवण्याची शक्यता आहे हे आझाद मैदानात ठणकावून सांगितले होते.

 

👉१ जानेवारी २०२४ रोजी सर्वांसाठी उपयुक्त असा शासन निर्णय जाहीर सविस्तर येथे पहा

 

परंतु त्यावेळेस स्वतः शिक्षणमंत्री साहेब मैदानावर आले व यांनी स्वतः जबाबदारी घेतल्याने आपण त्या दिवशी रात्री उशिरा निघालेल्या पत्रावर समाधान मानून आंदोलन मागे घेतले.मात्र नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात आपल्याला वाढीव टप्पासाठी डिसेंबर २०२४ लागेल असे सांगण्यात आले.
ही आपली फसवणूक असून याला जबाबदार आंदोलन करणारे कुणी नसून घरी बसणारे आपण लोक आहात.तेंव्हा त्यावेळी झाली ती चूक झाली,पण यावेळी कुणीच घरी राहू नका.कारण हे वर्ष विधानसभा व लोकसभा निवडणुकीचे आहे.

 

👉२०२४ मधील एकूण सार्वजनिक सुट्ट्यांची यादी येथे सविस्तर पहा

निवडणूक तोंडावर आल्यावर कोणतेच सरकार समाजातील कोणत्याच घटकाला नाराज करत नसते आणि निवडणूक झाल्यावर पुढील ४वर्षे कुणालाच गांभीर्याने घेत नसते,हा आपल्या लोकशाहीचा इतिहास आहे. यामुळेच येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुका किंबहुना आचारसहिंता लागण्यापूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होऊन १ जानेवारी २०२४ पासून वाढीव टप्पा व इतर आपल्या सर्व मागण्या बाबत शासन निर्णय होणे आवश्यक आहे.अन् हे शक्य आहे केवळ अन् केवळ आपल्या उपस्थितीवर.

 

प्रत्येक शाळेतील किमान २ शिक्षक व एक शिक्षकेत्तर कर्मचारी असे तीन जण जरी आले तरी १२०००-१५००० लोक जमू शकतात.आणि म्हणूनच राज्यातील तमाम विना तथा अंशतः अनुदानित शिक्षक यांना या पोस्ट द्वारे मी आवाहन करत आहे की बुधवार दिनांक ३ जानेवारी २०२४ पासून सर्वांनी आझाद मैदान, मुंबई गाठावे.झाले तर आत्ताच नाहीतर परत केवळ पश्चाताप करत बसावा लागेल.आपण सर्व सुज्ञ आहात,निश्चितच स्व -हित लक्षात घेऊन घर सोडाल अशी आशा आहे.

 

धन्यवाद,
खंडेराव जगदाळे.
🙏🙏🙏

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *