शाळांना वाढीव टप्पा अनुदान देण्याची कार्यवाही लांबणीवर…?

 

 

शाळा अनुदान update:ऐन दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये अघोषित, विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांनी आपल्या हक्काच्या 100% पगारासाठी शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर आंदोलन पुकारले होते.आंदोलनाची दखल घेत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब यांनी 1 जानेवारी 2024 पासून वाढीव टप्पा अनुदान देण्यात येईल असे जाहीर केले होते.

 

 

मा.शिक्षणमंत्री यांनी आझाद मैदान मुंबई येथे दिलेले शब्द पाळले नाहीत. ते म्हणाले होते की, 31 डिसेंबर 2023 पर्यंत 1160 कोटी रुपये कुठल्याही परिस्थितीत खर्च करून त्यानंतर सप्टेंबर महिन्याची संचमान्यता मिळाल्यानंतर एका वर्षाच्या आत सर्वच टप्प्यावरील शाळांना वाढीव अनुदान टप्पा देण्यात येईल असे आश्वासन देत तसे पत्र सुध्दा आर्थिक भारासह शासनास सादर करण्याचे आदेश देण्यात आले.

 

👉शाळांना मिळणार वाढिव टप्पा अनुदान

 

म्हणजे ज्या शाळांना 1 जानेवारी 2023 पासून 1160 कोटी रुपयांची तरतूद करून 31 डिसेंबर अखेर निधीचे वितरण करून 1 जानेवारी 2024 पासून पुढील वाढीव टप्पा अनुदान देण्यासाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात रीतसर घोषणा करून त्यानंतर मार्च 2024 मधील अर्थसंकल्पीय अधिवेशनात बजेट मंजूर करून 30 एप्रिल 2024 पर्यंत वितरण करतील अशी अपेक्षा राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सर्व शिक्षक संघटनांची होती. परंतू शिक्षणमंत्री शब्द फिरवून 2025 मध्ये वाढीव टप्पा अनुदान देण्यात येईल असे आश्वासन हिवाळी अधिवेशनात देतात.

 

👉शाळांना वाढिव टप्पा अनुदान मिळण्यासंदर्भात करावयाची कार्यवाही-शासन परिपत्रक निर्गमित

 

म्हणजेच पावसाळी अधिवेशन 2024 झाल्यानंतर विधानसभा निवडणुक 2024 आचारसंहिता लागू होऊन ऑक्टोबर मध्ये निवडणुका होतील. त्यानंतर ना सरकार राहणार, ना शिक्षणमंत्री हेच राहणार. नवीन सरकार, नवीन धोरण! येणार. मग, पून्हा सूरू होतो शिक्षणमंत्री व सरकारचा अभ्यास ! जसा महाविकास आघाडी सरकारने केला अडीच वर्ष; 20 महिन्याचे वेतन गिळून. तेंव्हा आता शांत बसून चालणार नाही तर कुठल्याही परिस्थितीत ऑक्टोबर 2024 च्या आचारसंहिता लागू होण्यापूर्वी वाढीव टप्पा अनुदान देण्यासाठी शासनास भाग पाडले पाहिजे. सन्माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेला शब्द पाळला नाही यामुळे सर्व शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरलेले आहे. त्यामुळे त्यांनी केली पंधरा-वीस वर्षे विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांचा व त्यांच्या कुटुंबाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून वाढीव टप्पा अनुदान देण्याची कार्यवाही तात्काळ करावी हि विनंती सर्व शिक्षक वर्गाकडून केली जात आहे.

 

👉इतर सर्व शैक्षणिक बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *