नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत निरीक्षरांचे सर्वेक्षण शिक्षकांनीच करणेबाबत.
नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत निरीक्षरांचे सर्वेक्षण हे सद्यस्थितीत सुरू असलेल्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणासोबतच प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांकडून करावयाचे आहे. शासनपरिपत्रक ..
👉शासन परिपत्रक 28/08/2023 चे पाहण्यासाठी येथे क्लिक करा
👉शासन परिपत्रक Download करण्यासाठी येथे क्लिक करा
शासन निर्णय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय, मुंबई दिनांक 14/10/2022 नुसार नवभारत साक्षरता कार्यक्रम सन 2022-20 23 ते सन 2026-20 27 या कालावधीमध्ये राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सदर योजनेच्या यशस्वी अंमलबजावणी करिता या कार्यालयास्तरावरून दिनांक 11/08/2023 व दिनांक 04/06/2023 नुसार मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.
👉14 /10/2022 चे परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या सर्वेक्षणाबाबत महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रांमध्ये सदरचे सर्वेक्षण स्वयंसेवी संस्था मार्फत करण्यात येणार असल्याच्या चुकीच्या बातम्या प्रसिद्ध झालेले आहेत. त्याअनुषंगाने आपणास कळविण्यात येते की असे कोणत्याही प्रकारचे आदेश या कार्यालयतुन निर्गमित झालेले नाहीत.
👉11/08/2023 चे परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत सर्वेक्षणीय सद्यस्थिती सुरू असलेल्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणासोबतच प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळातील शिक्षकांकडून करायचे आहे. याची नोंद घ्यावी. हे सर्वेक्षण शाळा भरण्यापूर्वी व शाळा सुटल्यानंतरच्या वेळेत शिक्षकांनी करायचे आहे ही बाब कटकश्याने पाळली जाईल याकडे लक्ष द्यावे.अशा महत्वपूर्ण सुचना देण्यात आलेल्या आहेत.