राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४% वाढ !

 

Breaking News: राज्य सरकारी कर्मचारी होणार मालामाल..! महागाई भत्त्यात झाली 4% वाढ, कधीपासून लागू होणार ?  सविस्तर माहिती पहा.

 

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे.राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ  केली आहे.

 

👉राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४% वाढ

 

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे. राज्य सरकारने चार टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे महागाई भत्ता आता 42 टक्क्यावरुन आता 46 टक्के करण्यात आला आहे. एक जुलै 2023 पासुनची महागाई भत्त्याची थकबाकीही मिळणार आहे. राज्य सरकारकडून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

👉शासन निर्णय सविस्तर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

मागील अनेक दिवसांपासून महागाई भत्ता वाढवण्याची मागणी करण्यात येत होती. वर्षातून दोन वेळा महागाई भत्ता वाढवला जातो. आज दि.23/11/2023 अर्थ विभागाने शासन निर्णय काढून महागाई भत्ता वाढवण्यात येत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे.

 

👉शासन निर्णय Download करण्यासाठी येथे क्लिक करा

 

महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपध्दती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहील. यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात, त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदात्रातून भागविण्यात यावा. अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ् हा खर्च खर्ची टाकण्यात यावा. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या  या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.

👉 जुनी पेन्शन योजना लागू होण्याची शक्यता सविस्तर बातमी येथे पहा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *