महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी आज हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काही महत्त्वाच्या मागण्या….!

 

Breaking News:महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी आज हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नागपूर येथे विधान भवनात शिक्षण मंत्री माननीय नामदार श्री दीपकजी केसरकर साहेब यांनी बैठक आयोजित केली त्यामध्ये प्रामुख्याने पुढील समस्या सोडवण्यात येणार.

 

👉वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके: राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर

 

 1)-शेवटचा वर्गाची पटसंख्या सरासरी धरणे किंवा 2023- 24 ची पटसंख्या पकडणे- शिक्षण मंत्री फायनल विचार करणार.

2)-आयुक्त स्तरावरील अघोषित शाळांचे सर्व प्रस्ताव मंजूर करून अनुदान देणे – मागणी मान्य

 3)-ज्या शाळेतील शिक्षक शिक्षकेतरांचे जावक नंबर जुळत नाही किंवा नोंदी नाहीत, त्यांच्या बाबतीत सहानभूतीने विचार करून 11 मुद्दे तपासून अनुदान देण्याचे ठरले.

👉शैक्षणिक बातम्या लिंक

👉अंशतः अनुदानित शाळांना मिळणार वाढीव टप्पा अनुदान

 

4)- 20% अनुदान मंजूर झालेल्या शाळेतील शिक्षकेतरांचे 11 पैकी सहा मुद्दे उपलब्ध नसतील तर दोन मुद्दे धरावेत व अनुदान द्यावे.

5)-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती कोर्टाची स्थगिती असल्यामुळे करता येत नाही, परंतु एकही कर्मचारी जिथे नाही काहीतरी मार्ग काढावा अशी मागणी केली.

 

👉7 डिसेंबर 2023 चा शासन निर्णय सविस्तर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

5)-पुढील टप्पा वाढ 1 जानेवारीपासूनच मिळणार, दरवर्षी 30 नोव्हेंबर ची पटसंख्या बघून टप्पा वाढ न थांबता देणार.

6)-उच्च माध्यमिक विद्यालयातील आयटी शिक्षकांना अनुदान मिळावे.

 

👉शैक्षणिक बातम्या लिंक

 

👉7 डिसेंबर 2023 च्या मिटिंगचे शासन परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

       उर्वरित विषय सोमवारी सर्व आमदार एकत्रित बसून चर्चा करणार आहेत व पुन्हा शिक्षण मंत्र्यांसोबत मीटिंग घेणार आहेत असे ठरले आहे.

 

        यावेळी बैठकीस कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर, आमदार निरंजन डावखरे , आमदार मनीषा कायंदे मॅडम, आमदार विक्रम काळे, आमदार किशोर दराडे, आमदार जयंत आसगाकर, आमदार सुधाकर आडबले,आमदार किरण सरनाईक , आमदार सत्यजित तांबे, आमदार राठोड,माजी आमदार श्रीकांत देशपांडे , तसेच प्रधन सचिव रणजित सिंह देओल,शिक्षण आयुक्त,सूरज मांढरे, सह सचिव- श्री समीर सावंत, करपते साहेब उप सचिव तुषार महाजन साहेब, काझी साहेब उपस्थित होते.

👉राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४% वाढ

👉शाळांना मिळणार वाढिव टप्पा अनुदान

👉 Maharashtra Board Exam Timetable 2024 Declare…

👉चॅटबॉटवर विद्यार्थ्यांचे ऑनलाईन गुणनोंदणी कशी करावी?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *