20,40 व 60 टक्के शाळांना मिळणार अनुदानाचा वाढीव टप्पा 

 

 

Breaking News:राज्यातील 62 हजार शिक्षकांसाठी दिवाळीत आनंदाची  बातमी प्रस्ताव देण्यासाठी 31 डिसेंबरची मुदत.

👉Education news group join kara

राज्यातील अंशतः विनाअनुदानित शाळांना अनुदानचा पुढील वाढीव टप्पा देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने माहिती मागितली आहे.ही माहिती देऊन हा विषय मार्गी लावण्यासाठी 31 डिसेंबरची मुदत दिली आहे. आता वाढीव टप्पा मिळणार या भावनेने शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निर्णयामुळे राज्यातील 62 हजार शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दिवाळीत आनंदाची बातमी मिळाली आहे.

 

👉शाळांना मिळणार वाढिव टप्पा अनुदान

 

अनुदानासाठी पात्र ठरलेल्या काही शाळांना अद्यापही अनुदान देण्याचे कारवाई सुरूच आहे ती कार्यवाही वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही या आदेशान्वये दिल्या आहेत. राज्यातील शाळांना 20,40 व 60 टक्के अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकार मधील शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेतला आहे. त्यासाठी अकराशे कोटी रुपयांची तरतूद करण्याचा ऐतिहासिक निर्णय केसरकर साहेब यांनी घेतला आहे.त्याची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे.

👉वाढीव टप्पा अनुदानचे शासन परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

अनुदान देण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत. त्या निर्णयाला अनुसरून अनुदानाचा वाढू टप्पा देण्यासाठीचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना शिक्षण संचालक उपसंचालक संबंधीत जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी यांना उपसचिव समीर सावंत यांनी सुचेना दिल्या आहेत. पात्र शाळा, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अनुदान देण्याची प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत 31 डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी या पत्राद्वारे दिले आहेत.

Naoday Pariksha-Vegali Aakruti Oalakha Video No.01

 

👉Education News-click here

याची अंमलबजावणी करताना कोणत्याही शिक्षक व शिक्षकेत्तर  कर्मचाऱ्यावर अन्याय होणार नाही याची दक्षता संबंधित विभागप्रमुखांनी घ्यावी असेही त्यात म्हटले आहे.त्यामुळे आता 20 टक्के अनुदान घेणाऱ्यांना 40 टक्के 40 टक्के घेणाऱ्यांना 60 टक्के तर 60 टक्के घेणाऱ्यांना  80 टक्के अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.प्रत्येक वर्षी वाढीव टप्पा अनुदान देण्यात येणार आहे.

👉दहावी-बारावी बोर्ड परीक्षेमध्ये झाला मोठा बदल!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *