या शिक्षकांना पदोन्नतीसाठी टिईटी परीक्षेची नाही गरज..

 

Breaking News:प्राथमिक शिक्षकांना विशेष शिक्षक म्हणून पदोन्नती देण्यासाठी Tet चे बंधन घालण्यात आले होते. राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद अधिसूचना दिनांक 12 नोव्हेंबर 2014 नुसार शिक्षकांच्या पदोन्नती वेतनितीसाठीही शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आली होती. तथापि राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद 2010 च्या अधिसूचनेतील मुद्दा क्रमांक तीन नुसार या अधिसूचनेपूर्वी जर शिक्षकांची नियुक्ती झाली असेल तर शिक्षक पात्रता परीक्षेतून (Tet) सूट देण्यात आली आहे.

 

👉या शिक्षकांना पदोन्नतीसाठी टिईटी परीक्षेची नाही गरज

 

अधिसूचना 2010 व 2014 मधील तरतुदीचा आधार घेऊन प्राथमिक शिक्षकांच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांच्या वेतनोत्ती जिल्हा स्तरावर होत नसल्याचे अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या निदर्शनात आणून दिले होते.अखेर पदोन्नतीसाठीची Tet ची अट राज्य शासनाने शिथिल केली. या संदर्भात कक्ष अधिकारी दत्तात्रय शिंदे यांनी दिनांक 25 ऑक्टोंबर 2023 रोजी शिक्षण संचालक प्राथमिक शरद गोसावी यांना आदेशित केले आहे.त्यामुळे शिक्षकांच्या बडतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

WhatsApp Group link

👉शाळांना मिळणार वाढिव टप्पा अनुदान

 

प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेत शिक्षक नियुक्तीसाठी आवश्यक असलेली Tet ची अट पदोन्नतीसाठीही लागू केल्याने राज्यातील हजारो शिक्षकांना फटका बसला होता.याबाबत अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे संस्थापक साजिद अहमद यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर शिक्षण संचालक प्राथमिक शरद गोसावी यांना निवेदन दिले होते.click त्यामुळे प्राथमिक शिक्षण संचालकांनी यासंदर्भात शिक्षण मंत्रालयाकडे मार्गदर्शन मागविले होते.त्यानुसार शिक्षकांच्या बडतीमधील Tet ची अट शिथिल करण्यात आली आहे.

👉शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी येथे पहा

ज्या शिक्षकांची नियुक्ती दिनांक 13 फेब्रुवारी 2013 पूर्वीचे आहे अशा शिक्षकांना आता बढती देण्यासाठी Tet आवश्यक नसेल, परंतु त्यांच्याकडे विषय शिक्षक या पदासाठी आवश्यक असलेले शैक्षणिक व व्यावसायिक अहर्ता असणे बंधनकारक आहे.ही अट निघाल्याने आता रखडलेल्या हजारो शिक्षकांच्या बढत्या मार्गी लागणार आहेत.

WhatsApp Group link

👉आकारिक मूल्यमापन सर्व विषयांच्या pdf नोंदी

राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषदेच्या (NCTE) आधीसूचनेनुसार प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिक्षकांसाठी Tet बंधनकारक आहे.तो संदर्भ घेत शिक्षण विभागाने शिक्षकांच्या बडतीसाठी  लागू केली होती परंतु टीईटी केवळ नियुक्तीसाठी आवश्यक असून विशेष शिक्षक ही नवी नियुक्ती नसून केवळ पदोन्नती आहे असा दावा अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघातर्फे करण्यात आला तर टीईटी परीक्षेचे आयोजनच 2013 पासून सुरू झाले आहे आणि सध्या पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या शिक्षकांची नियुक्ती त्यापूर्वीची असल्याने त्यांना टीईटी लागू होत नाही असा दावा करण्यात आला संघटनांच्या या मतांची शासन स्तरावर दाखल घेण्यात आली आहे.

 

👉 अल्पसंख्यांक शाळेतील शिक्षकांना टीईटीची अट शिथिल कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *