PM Poshanshakti Nirmal Yojana update:प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना अंडी/केळी या पदार्थाचा लाभ देण्यासंदर्भात संचालक साहेब यांच्या मार्गदर्शक सूचना…

केंद्र पुरस्कृत प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील शासकीय तसेच शासन अनुदानित शाळांमधील इ.१ ली ते इ.८ वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो. प्रस्तुत योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार इ.१ ली ते इ.५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ४५० उष्मांक व १२ ग्रॅम प्रथिनेयुक्त तसेच, इ. ६ वी ते इ.८ वीच्या विद्यार्थ्यांना ७०० उष्मांक व २० ग्रॅम प्रथिनेयुक्त मध्यान्ह भोजन देण्यात येते.

 

👉अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

सद्यस्थितीत प्रस्तुत योजनेंतर्गत तांदूळापासून बनविलेल्या पाककृतीच्या स्वरुपात पोषण आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत नियमित पोषण आहाराव्यतिरिक्त अतिरिक्त पुरक पौष्टिक पदार्थ विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. अंड्यांमधील पौष्टिक मूल्यांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी व अंडी उत्पादक शेतकऱ्यांना राज्यातंर्गत स्थानिक बाजारपेठ मिळवण्यासाठी प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत पोषण आहारामध्ये अंड्यांचा समावेश करण्याची विनंती कृषि विभागाने केली आहे. अंड्यामध्ये उच्च प्रतिचे प्रथिने, उष्मांक, जीवनसत्त्चे, लोह, कॅल्शियम, कार्बोहायड्रेड असल्याने पोषण आहारात अंड्यांचा समावेश केल्यास विद्यार्थ्यांची वाढ चांगल्या प्रकारे होवून त्यांची रोगप्रतिकार शक्ती सुधारण्यास मदत होणार आहे. शासनाने उक्त नमूद शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांच्या आरोग्य विकासाकरीता नियमित आहारासोबत अंडी/केळी अथवा स्थानिक फळे उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत प्रस्तुत उपक्रमाच्या अंमलबजावणीकरीता खालील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत.

 

👉राज्यातील शाळेच्या वेळेत होणार बदल सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

शैक्षणिक बातम्या लिंक👉Join

१. प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षामध्ये योजनेंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत नियमित पोषण आहारासोबत पौष्टीक पदार्थ देण्याकरिता अंडी उपलब्ध करुन देण्यात यावेत.

 

👉वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके: राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर

 

२. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षांमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील सर्व योजनेस पात्र शाळांमधील विद्यार्थ्यांना सद्यस्थितीत देण्यात येत असलेल्या नियमित आहाराव्यतिरिक्त २३ आठवड्याकरीता आठवड्यातून एक दिवस अंडी देण्यात यावीत.

 

३. सद्यस्थितीतील अंड्यांचा बाजारभाव विचारत घेता, एका अंडधासाठी रु.५/- इतका दर शासनाने निर्धारित केलेनुसार अनुज्ञेय करण्यात येत आहे.

 

👉पोषण आहाराच्या दरामध्ये केला महत्त्वाचा बदल शासन निर्णय येथे पहा

 

४. सदर उपक्रम ग्रामीण भागात शाळा व्यवस्थापन समितीमार्फत तसेच, नागरी भागात केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत आहार पुरविणाऱ्या आहार शिजवणाऱ्या यंत्रणेमार्फत राबविण्यात यावा,

 

👉शासन निर्णय Download करुन घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

५. ग्रामीण भागात शाळा व्यवस्थापन समितीने स्थानिक बाजारपेठेतून अंडी खरेदी करुन आठवड्यातील बुधवार किंवा शुक्रवार या दिवशी विद्यार्थ्यांना उकडलेले अंडे किंवा अंडा पुलाव / अंडा बिर्याणी या स्वरुपात सदर पदार्थाचा लाभ देणेत यावा.

 

६. जे विद्यार्थी शाकाहारी आहेत अथवा अंडी खात नाहीत अशा विद्यार्थ्यांना सदर दिवशी नियमित आहारासोबत रु.५/- मर्यादेत केळी अथवा अपवादात्मक परिस्थितीत स्थानिक फळ उपलब्ध करुन देण्यात यावे.

 

👉 शैक्षणिक बातम्या लिंक 👉 Join

 

७. प्रस्तुत उपक्रमाकरीता जिल्ह्यातील योजनेस पात्र सर्व शाळांच्या बैंक खात्यावर माहे डिसेंबर, २०२३ अखेर ६ आठवड्याकरीता प्रति आठवडा एक दिवस याप्रमाणे ६ दिवसांकरीता पटसंखेच्या प्रमाणात प्रति विद्यार्थी प्रति दिवस ६ प्रमाणे एकूण ३०/- रुपये, याप्रमाणे परिगणना करुन शाळेतील योजनेस पात्र विद्यार्थी संख्या विचारात घेऊन त्वरीत सदरचे अनुदान संबंधित शाळा व्यवस्थापन समितीच्या बैंक खात्यावर पीएफएमएस प्रणालीद्वारे वर्ग करण्यात यावे.

 

👉या शिक्षकांना पदोन्नतीसाठी टिईटी परीक्षेची नाही गरज?

 

८. दिवाळी सुट्टीनंतरच्या आठवड्यापासून प्रस्तुत उपक्रमाची अंमलबजावणी योजनेस पात्र सर्व शाळांमधून होईल, याची दक्षता शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी घ्यावयाची आहे.

 

९. पहिल्या टप्यात आवश्यक असलेला निधी ग्रामीण भागातील शाळांना (केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीतर्गत असलेल्या शाळा वगळून) अग्रीम स्वरुपात देण्यात यावा. तहनंतर सदर निधीचा शाळांनी केलेला विनियोग, उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी तसेच, केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त निधी विचारात घेवून पुढील निधी शाळांना उपलब्ध करुन देण्यात येईल.

 

👉पाचवी, आठवीच्या परीक्षा पध्दतीत बदल शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

१०. केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीतंर्गत असणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना संबंधित शाळेसाठी निश्चित केलेल्या अन्न शिजविणाऱ्या यंत्रणामार्फत बुधवार अथवा शुक्रवार या दिवशी उकडलेली अंडी / अंडा पुलाव / अंडा बिर्याणी या स्वरुपात लाभ देण्यात यावा, तसेच, जे विद्यार्थी अंडी खात नाहीत अशा विद्यार्थ्यांना नियमित आहारासोबत अतिरिक्त पुरक आहार म्हणून केळी देण्यात यावी. सदरप्रमाणे विद्यार्थ्यांना दिलेल्या लाभाची माहिती संबंधित शाळेतील मुख्याध्यापक यांच्याकडून प्रमाणित करुन घेण्यात यावी. सदर माहितीची महापालिका/नगरपालिका स्तरावर तपासणी करुन संबंधित जिल्हयातील शिक्षणाधिकारी (प्राथ) यांनी प्रत्येकी दोन महिन्यानी संबंधित अन्न शिजविणाऱ्या यंत्रणांना अंडी/फळे यांच्या देयकांची अदायगी करावी.

 

👉अत्यंत महत्त्वाचे शासन परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

११. शाळांनी नियमित आहाराची उपस्थितीची नोंद एमडीएम पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने नोंदविणे आवश्यक राहील, केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीतंर्गत असणाऱ्या शाळांनी देखील दैनंदिन उपस्थितीची माहिती एमडीएम पोर्टलवर करणे आवश्यक राहील. अंडी / केळी याचा विद्यार्थ्यांना निर्धारित दिवशी लाभ दिल्यास परंतु सदर दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती एमडीएम पोर्टलवर नोंदविली नसल्यास, सदर दिवसाकरीता वितरीत केलेल्या अंडी/फळे याकरीताचे अनुदान अनुज्ञेय केले जाणार नाही, याची स्पष्ट सूचना सर्व केंद्रीय स्वयंपाकगृह संस्थांना करुन देण्यात यावी.

 

👉SSC Maharashtra Board Exam Timetable 2024 Declare…

 

१२. अंडी / फळांचा लाभ शाळास्तरावर आठवड्यात एक वेळेस देणे आवश्यक आहे, यासोबतच जिल्हा परिषदेने निर्धारित केलेल्या पाककृतीनुसार आठवड्यातून एक दिवस नियमितपणे देण्यात येणा-या पूरक आहाराचा लाभ देणे आवश्यक राहील. १३. अंडी / फळांचा लाभ शाळास्तरावर नियमितपणे निर्देशित केलेनुसार विद्यार्थ्यांना उपलब्ध होत असलेबाबतची खातरजमा क्षेत्रीय स्तरावरील सर्व अधिका-यांनी शाळा भेटी दरम्यान करणेबाबत सूचना देण्यात याव्यात.

 

शैक्षणिक बातम्या लिंक 👉 Join

 

१४. शाळास्तरावरुन राबविण्यात येत असलेल्या प्रस्तुत उपक्रमाबाबत आवश्यक ती जनजागृती विविध प्रसार व प्रचार माध्यमाद्वारे करण्यात यावी. उदा. सामाजिक प्रसार माध्यमे, शिक्षकांचे विविध ब्लॉग, विविध संकेतस्थळे इ.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *